Wednesday, 31 August 2011

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी लोक घराघरात भगवान श्रीगणेशाची स्थापना करतात. व्रत करतात. धर्म शास्त्रांनुसार श्रीगणेश प्रथम पूज्य, ज्ञान आणि बुद्धीचा देव आहे. सर्व शुभ कार्याच्या आधी भगवान गणेशाची पूजा केली जाते. यंदा 1 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे.

गणेश चतुर्थीचा सण 10 दिवस साजरा करतात. या दिवसांत गावा गावात, चौका-चौकात सार्वजनिकरीत्या गणपतीची स्थापना केली जाते. शाळांमध्येही गणेशोत्सवाची लगबग असते. या निमित्ताने विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची आखणी करण्यात येते. व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात.

लाडू आणि मोदक गणपतीला प्रिय आहेत. महाराष्ट्रात सार्वजनिक गणपती उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी सुरू केली. गणपती हा लहान मुलांचा लाडका देव आहे. गणपती उपासना केल्याने जीवनातील विघ्ने दूर होतात. घरात सुख समृद्धी नांदते.

No comments:

Post a Comment

Followers