Wednesday, 31 August 2011



In Advance
I wiss You Happy GANESHCHATURTHI..

G-Give us
A-Always
N-New
E-Energy
S-spirit &
H-Happiness

JAY GANESH :

I wish u HAPPY GANESH PUJA n I pray 2 God 4 ur prosperous life. May u 5nd al delights of life, may ur al dreams com true.

GANESH AARTI LYRICS

Sukh karta dukhharta
Varta vighnachi
Noorvi poorvi prem krupya jayachi
Sarwangi sundar utishendu rachi
Kanthi jhalke maad mukhta padhanchi

Jai dev jai dev
Jai mangal murti
Darshan marte maan kamana purti
Jai dev jai dev

Ratna khachikata para


Sukhkarta Dukhharta Varta Vighnachi
Nurvi Purvi Prem Krupa Jayachi
Sarvangi Sundar Uti Shendurachi
Kanti Jhalke Mal Mukataphalaanchi
Jai dev jai dev
Jai mangal murti
Darshan marte maan kamana purti
Jai dev jai dev

Ratnakhachit Phara Tujh Gaurikumra
Chandanaachi Uti Kumkum ke shara
Hire jadit Mukut Shobhato Bara
Runjhunati Nupure Charani Ghagriya

Jai dev jai dev
Jai mangal murti
Darshan marte maan kamana purti
Jai dev jai dev

Lambodar Pitaambar Phanivar vandana
Saral Sond Vakratunda Trinayana
Das Ramacha Vat Pahe Sadna
Sankati Pavave Nirvani Rakshave Survar vandana

Jai dev jai dev 2
Jai mangal murti
Darshan marte maan kamana purti
Jai dev jai dev

Shendur laal chadhaayo achchhaa gajamukha ko
Dondil laal biraaje sut gaurihar ko
Haath liye gud ladduu saaii sukhar ko
Mahimaa kahe na jaay laagat huun pad ko


Jai jai jai jai jai
Jai jai jii ganaraaj vidyaasukhadaataa
Dhany tumhaaro darshan meraa mat ramataa
jai dev jai dev


Astha sidhi dasi sankat ko bairi
Vighan vinashan mangal murat adhikari
Koti suraj prakash aise chabi teri
Gandasthal Madmastak jhool shashi behari

Jai jai jai jai jai
Jai jai jii ganaraaj vidyaasukhadaataa
Dhany tumhaaro darshan meraa mat ramataa
jai dev jai dev

Bhaavabhagat se koi sharaNaagat aave
Santati sampatti sabahii bharapuur paave
Aise tum mahaaraaj moko ati bhaave
Gosaaviinandan nishidin gun gaave

Jai jai jai jai jai
Jai jai jii ganaraaj vidyaasukhadaataa
Dhany tumhaaro darshan meraa mat ramataa
jai dev jai dev

म‍राठी संस्कृतीतील गणेश

पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या पुरातन नारायणेश्वर मंदिरावरील गणेशपट्टी. घराच्या वा देवळाच्या द्वारावरील गणेशपट्टी वा गणेशप्रतिमा हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे
मराठी संस्कृतीत गणपतीचा उल्लेख अनेक ठिकाणी दिसतो.
महाराष्ट्रातील घरे व मंदिरांच्या मुख्य दारावर गणेशपट्टी वा गणेशप्रतिमा असते. गणपती हा विघ्नहर्ता असल्याने घरावर येणा-या संकंटांचे तो निवारण करेल ही भावना त्यामागे असते.
मराठी साहित्याच्या प्रारंभ काळापासून गणेशाचे उल्लेख आहेत. मराठी भाषेमधील आद्य वाङमयकार असलेल्या महानुभाव पंथातील कवी नरेंद्र यांच्या रुक्मिणी स्वयंवर ग्रंथात गणपतीचा असा उल्लेख येतो -
तेया गणरायाचे उदार रूपडे थोरपण जिंकले होडे ।
कवीस शब्दब्रह्मीची राणिव कोडे, जेणे पाहिले तो सिंदुरे आंडंबरे ।।
गोर मेरू जसा, तयाचे ठायी सिद्धीचे सर्ग, नानाविध वसती भोग ।
तेण आधारे अग्नेय सुखावले।।
ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीतील खालील नमनाची ओवी सुप्रसिद्ध आहे -
ओम नमोजी आद्या | वेदप्रतिपाद्या | जयजय स्वसंवेद्या | आत्मरूपा ||
देवा तुचि गणेशु| सकलमतिप्रकाशु| म्हणे निवृत्तीदासु | अवधारिजोजी ||
नामदेवांनीही गणेशस्तवनाचा अभंग लिहिला आहे. त्यात ते म्हणतात -
लंबोदरा तुझा, शोभे शुंगदंड करितसे खंड दुश्चिन्हांचा ||
चतुर्थ आयुधे शोभतासी हाती भक्ताला रक्षिती निरंतर ||
तुकोबा गणपतीला नाचत येण्याची विनंती करतात -
गणराया लौकरी येई । भेटी सकलांसी देई ।।
अंगी सिंदूराची उटी । केशरकस्तुरी लल्लाटी ।।
पायी घाग-या वाजती । नाचत आला गणपती ।।
तुका म्हणे पाही । विठ्ठल गणपती दुजा नाही ।।
गणपती संतवाङमय व शास्त्रपुराणांबाहेर पडून लोकसंस्कृतीतही अनेक ठिकाणी आला आहे. तमाशातला प्रारंभीचा गण गणेशस्तवनाचा असतो. यात गणपती ऋद्धीसिद्धींसह नाचत येतो.
पठ्ठे बापूराव आपल्या कवनात म्हणतात - तुम्ही गौरीच्या नंदना । विघ्न कंदना । या नाचत रमणी । जी जी जी ||
कोकणातील गणपतीच्या नाचाची गाणी प्रसिद्ध आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील बाल्यांचा गणपतीचा नाच दमदार व लक्षवेधी असतो. बाल्यांचे गणपतीचे एक गाणे असे - यावे नाचत गौरीबाळा । हाती घेऊनी पुष्पांच्या माळा । सर्वे ठायी वंदितो तुला | यावे नाचत गौरीबाळा।
[१९] लोकगीतामध्येही गणपतीचे वर्णन येते. कार्तिकेय गणपती भावांचा झगडा, शंकरपार्वतीचे बालकौतुक असे अनेक विषय यात आहेत. एका लोकगीतातले वर्णन असे - [२०]
हिथं बस तिथं बस, गणू माज्या बाळा ।।
आमी जातो आमी जातो, सोनारू साळा ।।
सोनारीन बाई ग सोनारू दादा ।।
बाळाचं पैजण झालंका न्हाई ?
फिरून येजा फिरून येजा गवराबाई गवराबाई ।।
हिथं बस तिथं बस, गणू माज्या बाळा ।।
गवराबाईने म्हणजे गणपतीच्या आईने (गौरीने) गणेशबाळासाठी सोनाराकडे पैजण करायला टाकले आहेत आणि सोनाराने ते अजून दिले नाहीत असे वर्णन या गाण्यात आहे.
असे मराठी संस्कृतीत ठायीठायी असणा-या गणपतीचा उत्सव सार्वजनिक करून लोकमान्य टिळकांनी गणेशाचे महाराष्ट्राच्या लोकजीवनातील महत्व अधोरेखित केले.

गणेश संकल्पनेचा ऐतिहासिक मागोवा

सध्या स्मिथ्सोनियन इन्स्टिट्यूटमध्ये असलेले व मूळचे इ.स. १३ व्या शतकातील म्हैसूर भागातीलगणपतीचे पाषाणशिल्प
गणपतीचा प्रथम उल्लेख प्राचीनतम हिंदू धर्मग्रंथ असलेल्या ऋग्वेदात मिळतो. दोन ऋक मंत्र (गणानाम गणपतीम् हवामहे... [२] व विषु सीदा गणपते...[३] ) वैदिक गणपतीचा स्पष्टपणे निर्देश करतात. जरी हा वैदिक गणपती व सध्या पूजिला जाणारा पौराणिक गणपती एक नसला तरी वेदोत्तर काळात ऋग्वेदातील गणपती-ब्रह्मणस्पती-वाचस्पतीपासूनच पौराणिक गजवदन-गणेश-विघ्नेश्वर हे रूप उद्भवल्याचे अनेक संशोधक मान्य करतात.[४]
ऋग्वैदिक गणपतीची दुसरी नावे होती -बृहस्पतीवाचस्पती. ही देवता ज्योतिर्मय मानली जाई. तिचा वर्ण लालसर सोनेरी होता. अंकुशकुर्‍हाड ही या देवतेची अस्रे होती. या देवतेच्या आशिर्वादाविना कोणतीही इष्टकाम संभव होणार नाही असे मानले जाई. ही देवता कायम ‘गण’ नामक एका नृत्यकारी दलासोबत विराजमान असे व देवतांची रक्षकही मानली जाई.[५]
दुसर्‍या मतानुसार भारतातील अनार्यांच्या हस्तिदेवता व लम्बोदर यक्षाच्या एकत्रिकरणातून गणेश संकल्पना निर्मिली गेली. गणेश या मूळच्या अनार्य देवतेचे आर्यीकरण झाले असावे हा दुसरा कयास लावण्यात येतो. गणेशाचे वाहन उंदिर याच आदिम संस्कृतीचे प्रतीक म्हणून राहिले असावे. इसवीसनपूर्व आठव्या शतकापासून सहाव्या शतकाच्या मध्यापर्यंत लिहिल्या गेलेल्या बौधायण धर्मसूत्रात गणेशाचा उल्लेख नाही. इसवीसनाच्या चौथ्या शतकातीलकालिदास, इसवीसनाच्या सहाव्या शतकातील भारवी, इसवीसनाच्या पाचव्या शतकातील पंचतंत्र वा भरताच्या नाट्यशास्त्रातही गणेश देवता दिसत नाही. गुप्त काळाच्या अस्तकाळापासून या देवतेची स्वतंत्र पूजा प्रचलित झाली असावी.
मानवगृह्यसूत्र व याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये शाल, कटंकट, उष्मित, कुष्माण्ड राजपुत्र व देवयजन इत्यादीचा विनायक म्हणून उल्लेख आहे. महाभारतातील विनायक हाच आहे. याचे काम विघ्न उत्पादन करणे असे. पुढे हाच विघ्नकर्तागणपती विघ्नहर्ता मानला जाऊ लागला. याज्ञवल्क्य स्मृतीनुसार विनायक हा अम्बिकेचा पुत्र होय. गणेशाचापार्वतीपुत्र उल्लेख येथेच प्रथम होतो. अनेक पुराणे स्वयम्भू मानतात.कार्तिकेयाचे अनेक गण वा पार्षदही पशुपक्ष्यांचे मुखधारित असतात. इसवीसनाच्या सहाव्या शतकातील 'भूमारा'त याप्रकारच्या अनेक गणांचा उल्लेख सापडतो. गणेश म्हणजेच गण-ईशाचे ह्त्तीमुख असण्याचे हेही कारण असू शकते. काही ठिकाणी गणेश व यक्ष/नागदेवता यांची वर्णने मिसळल्याचे दिसते. गणपतीच्या ह्त्तीमुखाचे हेही कारण असावे. पुराणांमध्ये ह्त्तीमुखधारी यक्ष आहेत. यक्ष हे गणपती प्रमाणे लंबोदर असतात.
'याज्ञवल्क्य संहिता' या ग्रंथात विनायक व गणपतीच्या पूजेचे विवरण सापडते.इसवीसनाच्या सातव्या शतकात रचलेल्या ललित माधव-ग्रंथात गणपतीचा उल्लेख आहे.[६]

गणेश संकल्पनेचा ऐतिहासिक मागोवा

सध्या स्मिथ्सोनियन इन्स्टिट्यूटमध्ये असलेले व मूळचे इ.स. १३ व्या शतकातील म्हैसूर भागातीलगणपतीचे पाषाणशिल्प
गणपतीचा प्रथम उल्लेख प्राचीनतम हिंदू धर्मग्रंथ असलेल्या ऋग्वेदात मिळतो. दोन ऋक मंत्र (गणानाम गणपतीम् हवामहे... [२] व विषु सीदा गणपते...[३] ) वैदिक गणपतीचा स्पष्टपणे निर्देश करतात. जरी हा वैदिक गणपती व सध्या पूजिला जाणारा पौराणिक गणपती एक नसला तरी वेदोत्तर काळात ऋग्वेदातील गणपती-ब्रह्मणस्पती-वाचस्पतीपासूनच पौराणिक गजवदन-गणेश-विघ्नेश्वर हे रूप उद्भवल्याचे अनेक संशोधक मान्य करतात.[४]
ऋग्वैदिक गणपतीची दुसरी नावे होती -बृहस्पतीवाचस्पती. ही देवता ज्योतिर्मय मानली जाई. तिचा वर्ण लालसर सोनेरी होता. अंकुशकुर्‍हाड ही या देवतेची अस्रे होती. या देवतेच्या आशिर्वादाविना कोणतीही इष्टकाम संभव होणार नाही असे मानले जाई. ही देवता कायम ‘गण’ नामक एका नृत्यकारी दलासोबत विराजमान असे व देवतांची रक्षकही मानली जाई.[५]
दुसर्‍या मतानुसार भारतातील अनार्यांच्या हस्तिदेवता व लम्बोदर यक्षाच्या एकत्रिकरणातून गणेश संकल्पना निर्मिली गेली. गणेश या मूळच्या अनार्य देवतेचे आर्यीकरण झाले असावे हा दुसरा कयास लावण्यात येतो. गणेशाचे वाहन उंदिर याच आदिम संस्कृतीचे प्रतीक म्हणून राहिले असावे. इसवीसनपूर्व आठव्या शतकापासून सहाव्या शतकाच्या मध्यापर्यंत लिहिल्या गेलेल्या बौधायण धर्मसूत्रात गणेशाचा उल्लेख नाही. इसवीसनाच्या चौथ्या शतकातीलकालिदास, इसवीसनाच्या सहाव्या शतकातील भारवी, इसवीसनाच्या पाचव्या शतकातील पंचतंत्र वा भरताच्या नाट्यशास्त्रातही गणेश देवता दिसत नाही. गुप्त काळाच्या अस्तकाळापासून या देवतेची स्वतंत्र पूजा प्रचलित झाली असावी.
मानवगृह्यसूत्र व याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये शाल, कटंकट, उष्मित, कुष्माण्ड राजपुत्र व देवयजन इत्यादीचा विनायक म्हणून उल्लेख आहे. महाभारतातील विनायक हाच आहे. याचे काम विघ्न उत्पादन करणे असे. पुढे हाच विघ्नकर्तागणपती विघ्नहर्ता मानला जाऊ लागला. याज्ञवल्क्य स्मृतीनुसार विनायक हा अम्बिकेचा पुत्र होय. गणेशाचापार्वतीपुत्र उल्लेख येथेच प्रथम होतो. अनेक पुराणे स्वयम्भू मानतात.कार्तिकेयाचे अनेक गण वा पार्षदही पशुपक्ष्यांचे मुखधारित असतात. इसवीसनाच्या सहाव्या शतकातील 'भूमारा'त याप्रकारच्या अनेक गणांचा उल्लेख सापडतो. गणेश म्हणजेच गण-ईशाचे ह्त्तीमुख असण्याचे हेही कारण असू शकते. काही ठिकाणी गणेश व यक्ष/नागदेवता यांची वर्णने मिसळल्याचे दिसते. गणपतीच्या ह्त्तीमुखाचे हेही कारण असावे. पुराणांमध्ये ह्त्तीमुखधारी यक्ष आहेत. यक्ष हे गणपती प्रमाणे लंबोदर असतात.
'याज्ञवल्क्य संहिता' या ग्रंथात विनायक व गणपतीच्या पूजेचे विवरण सापडते.इसवीसनाच्या सातव्या शतकात रचलेल्या ललित माधव-ग्रंथात गणपतीचा उल्लेख आहे.[६]

नावे

पुराणांमध्ये गणपती शिवहर, पार्वतीपुत्र नावाने शंकरपार्वतींचा मुलगा नावाने उल्लेखित आहे. गणपतीची इतर काही नावे आहेत -
गणपतीहेरंबमहागणपतीमहोदरएकदंतलक्ष्मीविनायकविकटउच्छिष्टगणपती
विरिगणपतीशक्तिगणपतीविद्यागणपतीगजाननविनायकहरिद्रागणपतीविघ्नराजवक्रतुंड
माघ शुक्ल चतुर्थी व भाद्रपद शुक्ल चतुर्थी असा दोनदा जन्म झाल्याने द्वैमातुर नावानेही ही देवता ओळखली जाते. या देवतेस अग्रपूजेचा मान असतो. हिंदू धर्मग्रंथात या देवतेची वर्णने स्थलपरत्वे बदलत असली तरी हत्तीचे मुख आणि मनुष्याचे शरीर असलेली देवता हे वर्णन समान आहे. या देवतेचे वाहन काही ठिकाणी उंदीर तर काही ठिकाणी सिंह सांगितले आहे.संदर्भ हवा ]
पुराण व साहित्यात गणपतीचे अनेक ठिकाणी उल्लेख आहेत. गणपती हा महाभारताचा लेखनिक होता. भारतातसर्वत्रच गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व उत्सव होतात. गणेशाचा उपासक संप्रदाय गाणपत्य नावाने ओळखला जातो. गणेश गायत्री मंत्र असा आहे –
महत्काया विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्
सवाहन गणेश, कर्नाटकातील तळकाडुच्या वैद्येश्वर मंदिरातील शिल्प

व्युत्पत्ती

गणेश शब्दाचा अर्थ गणांचा- ईश वा प्रभू असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय. गणांचा अधिपती म्हणून गणपतीअसेही नाव या देवतेस आहे. महाराष्ट्रात हे नाव विशेष लोकप्रिय आहे. विनायक हे नाव दक्षिणेत वापरतात. हे नाव ‘गणपती’ नावाशी संबंधित आहे. विनायक- शब्दाचा अर्थ वि म्हणजे विशिष्टरूपाने जो नायक (नेता) आहे तो. याच अर्थाने गणाधिपतीनावही प्रचारित आहे. हेरंब नाव देशीय प्राकृत शब्द हेरिम्बो पासून आले आहे. हेरंब म्हणजे दीनजनांचा तारणकर्ता होय.वक्रतुण्डएकदंतमहोदयगजाननविकट आणि लंबोदर ही गणपतीची देहविशेष दर्शविणारी नावे आहेत.
वक्रतुण्ड म्हणजे ज्याचे तुण्ड (तोंड) वक्र वा वाकडे आहे तो. गणपतीच्या सोंडेमुळे चेहरा थोडासा वक्र दिसतो त्यामुळे हे नाव.एकदंत म्हणजे ज्याला एक दात आहे तो. गणपतीस एक दात असण्याच्या अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. प्रथम कथेनुसार, परशुरामाने युद्धात गणपतीचा एक दात उपटला. दुसर्‍या कथेनुसार कैलास पर्वतावर गणपतीने रावणास अडवले म्हणून रावणाने गणपतीचा एक दाताचे उत्पाटन केले. आणखी एका कथेनुसार खेळाखेळातील लढाईत कार्तिकेयाने गणपतीचा एक दात भग्न केला. महोदर आणि लंबोदर शब्दांचा अर्थ अनुक्रमे महा म्हणजे मोठे उदर (पोट) असणारा व लंब वा लांबडे उदर (पोट) असणारा असा आहे. ही दोन्ही नावे गणपतीचे स्थूलत्व दाखवतात. विघ्नराज वा विघ्नेश्वर शब्दाचा अर्थ सकल विघ्न वा बाधांचा अधिपती असा आहे. पुराणात सर्वत्र गणपतीचा विघ्नाधिपती म्हणून उल्लेख आढळतो. सकल बाधांचा अधिपती व नियंत्रक असल्यामुळे गणपतीस हे नाम प्राप्त झाले.[१]




देशवासियांचा राष्ट्रअभिमान जागृत करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी 1893 साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. गणेश उत्सवातून राष्ट्रीय एकात्मता जोपासणे हा या मागचा टिळकांचा हेतू होता. अनेक दिवसांपासून ब्रिटीशांच्या जोखडात निपचत पडलेल्या तरुणाईला स्वराज्य प्राप्तीचा मार्ग दाखवणारा गणेशोत्सव हा महामार्ग ठरला तसा स्वातंत्र्य लढ्यासाठी हा उत्सव मैलाचा दगड ठरला. 1893 पासून आजपर्यंत या देशात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आता परदेशातही या उत्सवाला मोठे स्वरुप आल्याने या उत्सवाचे महत्व अधोरेखीत होते. काळाबरोबर गणेश उत्सव साजरा करण्याचा ढंग थोडा बदलला असला तरी एक राष्ट्रीय उत्सव म्हणूनच नव्हे सातासमुद्रा पल्याड हा उत्सव गेला आहे.
दोन हजार दहाचा सप्टेंबर महिना राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण महिना म्हणून समोर आला आहे. अकरा तारखेलाच ईद आणि श्रीचे आगमन असा दुग्धशर्करा योग आलेला आहे. गणेश उत्सव हा तरुणाईसाठी मोठा आवडता उत्सव. या दहा दिवसांच्या काळात तरुणाईचे मोठे शक्तीप्रदर्शन दिसून येते. अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळाद्वारे हा उत्सव साजरा होत असल्याने तरुणाईच्या उत्साहाला एकच उधाण आलेले असते. स्वातंत्र्यपूर्व गणेश उत्सव आणि आजचा गणेश उत्सव यात मोठ्या प्रमाणात तफावत असली तरी आज आणि उद्यासाठीही गणेशोत्सवाची आवश्यकता भासणार आहे. देशातील युवापिढी मोठ्या प्रमाणात भरकटत चालली आहे. आज गरज आहे ती भरकटत चाललेल्या युवापिढीला वाचविण्याची त्यांना योग्य दिशा देऊन राष्ट्रीय प्रवाहात आणण्याची ! आमचा देश सर्वाधिक तरुणाचा देश म्हणून आज ओळखला जातोय. या तरुणाईच्या जोरावरच आम्ही उद्याच्या महासत्तेचा प्रपंच करतोय तेव्हा या युवा पिढीला अशा उत्सवांच्या माध्यमातून बांधील करुन एक समर्थ राष्ट्र निर्माण करण्याची आज गरज आहे. गणेश उत्सवासारखे उत्सव या कामी मोठे उपयोगी ठरु शकतात.
अनेक विद्यान आजच्या गणेश उत्सवावर टिका करतात. म्हणे तरुणाई बिघडली असा त्यांचा आक्षेप. निश्चित काही प्रमाणात आजच्या गणेश उत्सवाला काही प्रमाणात गालबोट लागले असले तरी एकामुळे सारेच नाशवंत ठरण्याची ही स्पर्धा पाहिली की कीव येते. आजही अशी अनेक गणेश मंडळे आहेत जी स्वातंत्र्यपूर्व गणेश उत्सवाच्या मर्यादेतच राहून आपला उत्सव उत्साहात साजरा करीत आहेत. यावेळी बारा दिवसांचा गणेश उत्सव आला आहे. मोठ्या प्रमाणात युवा वर्ग हा उत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु आज या उत्सवानिमित्ताने काही गोष्टीकडे जाणीवपूर्वक पाहणे गरजेचे आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सार्वजनिक गणेश उत्सव साजरा होणे आज गरजेचे आहे. आज देशासमोर मोठ्या प्रमाणात आव्हाने आहेत. या आव्हानाचा विचार करुन आज गणेश उत्सव होणे आवश्यक आहे. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. या राजधानीत मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा केला जातो. संयम, शिस्त, बांधीलकी, राष्ट्रीय भावना याचा सुरेख मिलाफ यावेळी दिसून येतो. पण यावेळी पुण्यातील स्वाईन फ्ल्यू साऱ्या महाराष्ट्रभर पसरला आणि एकच धांदल उडाली. तेव्हा यावेळी स्वाईन फ्ल्यू सारख्या संकटाचाही विचार गणेश मंडळांना करावा लागणार आहे. महाराष्ट्रात सध्या विजेचा मोठा तुटवडा आहे तेव्हा उगीच दिव्याची आरास उभी करुन विजेचा तुटवडा वाढवू नये. यंदा महाराष्ट्रात पावसाने मोठी कृपा केली असली किंवा पिण्याच्या पाण्याचे संकट संपले असले तरी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात गोरगरीबांच्या घराची पडझड झाली आहे. अनेक निराधार कुटूंबे आहेत. अनेक आर्थिक विवंचनाग्रस्त, शिक्षणापासून वंचित मुले आहेत. ज्यांना आज आर्थिक मदतीची गरज असून त्या कामी काही मंडळे करु शकली तर आजचा उत्सव हा अधिक सार्थ ठरल्यासारखे होईल. आजच्या उत्सवात मध्यधुंद अवस्थेत नृत्य अविष्कारांचा मोठा नमुना पाहण्यास मिळत आहे. तेव्हा हाही टाळता आला तर हा उत्सव अधिक परिणामकारक ठरेल. 
वृक्षारोपण सारखे सार्वजनिक उपक्रम हाती घेण्याचीही आज गरज आहे. निधीसंकलन करताना कुणावर जोरजबरदस्ती न करता ती एक चांगल्या विधायक कामासाठी वापरण्यात यावी. उत्सवप्रयीता ही भारतीय संस्कृतीची खरी ओळख आहे. त्यामुळे उत्सव साजरा करताना देश, काल, परिस्थिती ध्यानात ठेऊन तो साजरा करावा व तो आनंदात, शांततेत व सर्वांच्या सुखासाठी व्हावा. मंडळा-मंडळात स्पर्धा करुन किंवा एकमेकांविरोधात कुरबुऱ्या केल्याने आमची युवा शक्ती क्षीण होत जारणार असल्याने सर्वांनी एकात्मतेचा संदेश देण्यासाठी गणेश उत्सवाचा उपयोग करावा. वाद्य किंवा डेकोरेशन यामुळे बऱ्याचदा तक्रार येतात तेव्हा ती वाजविताना मंडळांनी स्वत:च एक स्वत:ची आचारसंहिता करावी. या लहानसहान पण मोठ्या गोष्टी लक्षात घेऊन उत्सव साजरे झाले तर ते का बरे कुणाला आवडणार नाहीत. धन्यवाद !

GANESH CHATURTHI

गौरी-गणपतीच्या निमित्ताने माहेरची आठवण यायला सुरुवात झालीये. दर वर्षी अगदी पारंपारीक पद्धतीने बसवला जाणारा गणपती कायमचा मनात घर करुन राहीलाय. माझे स्वत:चे श्रद्धास्थान म्हणजे "बाप्पा". आणि श्रद्धा अधिक वाढण्याचे विशेष कारण म्हणजे मागच्या वर्षी याच दहा दिवसात माझे लग्न ठरले आणि नविन गोड आठवणी तयार झाल्या. यावर्षी सासरी माझा पहिलाच गणेश उत्सव, आणि आठवले ते सगळे याआधीचे गणेश उत्सव..... ते असे,
आध्यात्मिक, परंपरा जपणारे आमचे बाबा यावेळी मात्र मी कसा आधुनिक विचारांचा आहे? हे दाखवुन दयायचे. तृतीयेला मूर्ति घरी आणण्यापासून ते बोटीत बसून नदीत विसर्जन करण्यापर्यंत ती मूर्ति आम्हा दोन बहिणींच्या हातात दयायचे. अभिमानाने माझी ही "दोन मुले" आहेत सांगायचे. अशा या माझ्या बाबांसाठी, त्यांनीच शिकवलेले, त्यांच्याचसाठी.... आणि तुमच्या माहितीसाठी थोडसं लिहिण्याचा प्रयत्न....
आपले आराध्य दैवत असलेल्या गणरायाची भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी स्थापना केली जाते. काही ठिकाणी गणपतीची शाडूची, प्लॅस्टर ऑफ पॅरिसची तर अगदी चांदीची देखील मूर्ति बसवतात. ती घरी आणताना तिचा चेहरा नविन वस्त्राने झाकतात, ती आणताना चंद्राकडे पाहु नये, पाहिल्यास त्यावर्षी त्या माणसावर चोरीचा आळ येतो असं म्हणतात. यामागची पौराणिक कथा माहिती असल्यास जरुर पाठवावी. चतुर्थीला अगोदर हरतालिकेच्या पुजेचे विसर्जन करतात. नंतर गणपतीची साग्रसंगीत प्रतिष्ठापना केली जाते. त्यादिवशी गणपतीला लाल फुले ( गणपती ही बुद्धीची देवता मानली जाते, मनुष्याला जे तेज प्राप्त होते ते त्याच्या ज्ञानामुळे. ज्याप्रमाणे सूर्याच्या किरणांची झळाळी प्रखर लाल असते त्याप्रमाणेच तेजाचा रंग देखील लाल मानला जातो. अशा या तेजस्वी देवाला लाल फुले वाहतात) कमळ, दुर्वा (इतरवेळी पायी तुडवले जाणारे गवत. दुर्वांना ३ दले असतात. ती दले बालपण, तारुण्य, वृद्धत्व यांचे प्रतिक मानली जातात.या तिनही अवस्थांमधे त्या जिवनदात्याला शरण जावे, म्हणून दुर्वा वाहिल्या जातात) केवडा, तुळस, बेल अशी विविध २१ प्रकारची पत्री वाहतात. प्रसादाला पंचामृत ( दूध, दही, साखर, मध, तूप), पंचखाद्य (खारीक, खसखस, खडीसाखर, खवा, खोबरे) व उकडीचे मोदक करतात. सकाळ, संध्यकाळी आरती, अथर्वशीर्ष याचे पठण केले जाते. खिरापतीला विविध गोड पदार्थ केले जातात. दिड, दोन, पाच, सात आणि दहा दिवसांचा गणपती प्रत्येक घराच्या प्रथे प्रमाणे बसवला जातो.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामधे सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. याकारणाने लोक एकत्र जमतात, विचारांची देवाणघेवाण देखील केली जाते. लो. टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट पूर्ण होताना दिसते.
परंतु याचे बदलेले व्यापारीक स्वरुप मात्र मुख्य उद्दिष्टापासून विचलीत करणारे आहे, नाही का?
आपले विचार, गणेशपूजे बद्दल अधिक माहिती, त्यामागच्या पौराणिक कथा, जरुर कळवा. जेणेकरुन ती सर्व माहिती आपल्याला सगळ्यांना एकाच ठिकाणी वाचता येईल.
तर मग परत भेटूयात... तुमच्या-माझ्या नविन माहिती सोबत....

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी लोक घराघरात भगवान श्रीगणेशाची स्थापना करतात. व्रत करतात. धर्म शास्त्रांनुसार श्रीगणेश प्रथम पूज्य, ज्ञान आणि बुद्धीचा देव आहे. सर्व शुभ कार्याच्या आधी भगवान गणेशाची पूजा केली जाते. यंदा 1 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे.

गणेश चतुर्थीचा सण 10 दिवस साजरा करतात. या दिवसांत गावा गावात, चौका-चौकात सार्वजनिकरीत्या गणपतीची स्थापना केली जाते. शाळांमध्येही गणेशोत्सवाची लगबग असते. या निमित्ताने विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची आखणी करण्यात येते. व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात.

लाडू आणि मोदक गणपतीला प्रिय आहेत. महाराष्ट्रात सार्वजनिक गणपती उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी सुरू केली. गणपती हा लहान मुलांचा लाडका देव आहे. गणपती उपासना केल्याने जीवनातील विघ्ने दूर होतात. घरात सुख समृद्धी नांदते.

GANESH CHATURTHI



अख्या महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणजे गणपती. ह्या ज्ञानाच्या देवाचे म्हणजेच गणरायाचे भाद्रपद शुद्ध चतुर्थीस आगमन होते. या चतुर्थीस ‘गणेश चतुर्थी’ म्हणतात. प्रत्येक चतुर्थीस विशिष्ट नावे आहेत. शुक्ल पक्षातील चतुर्थीस विनायकी, कृष्णपक्षातील चतुर्थीस संकष्टी व मंगळवारी आली तर अंगारकी चतुर्थी म्हणतात. भाद्रपद व माघ महिन्यातील चतुर्थीना विशेष महत्व आहे.
यादिवसाबद्दल पुराणांमध्ये बऱ्याच कथा आहेत. काही कथांनुसार या दिवशी गणपतीचा जन्म झाला. काहीनुसार या दिवशी म्हणजेच भादपद चतुर्थीला त्याने गजासुराचा नाश केला. ते काहीही असो पण या दिवसापासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीस विघ्नहर्ता गणेशाची, त्याला घरी आणण्याची प्रथा रुढ झाली.
या दिवशी गणेशमूर्ती घरी आणतात. ती पूर्व-पश्चिम किंवा उत्तरेकडे तोंड करू ठेवतात. पुजेला चंदन, दूर्वा, केतकी, तुळस, शेंदूर वगैरे एकवीस प्रकारची पत्री महाभिषेक करून भक्तीभावाने आवाहन, आसन, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, पुण्य, धूप, दीप, नैवेद्य, नमस्कार, प्रदक्षिणा व मंत्रपुष्प अशा सोळा उपचारांनी जाणकार व्यक्ती पूजा करते. फक्त याच दिवशी गणपतीला तुळस वाहतात. नंतर सुखहर्ता दुखहर्ता आरती म्हणतात. आरतीनंतर शमी, केतकी, दूर्वा, शेंदूर वाहून मोदकांचा नैवद्य वाहतात. घरोघरी आपापल्या परंपरेनुसार दीड, पाच, सात अथवा दहा दिवस गणपती बसवतात व विसर्जनावेळी समुद्र, नदी किंवा तळयात दोन वेळा बुडवून वरखाली करतात व विसर्जन करतात.
गणपती ही विज्ञान देवता आणि सामाजिक देवतासुद्धा आहे. कोणत्याही कार्याची सुरवात गणेशपुजेने होते. श्रीगणेश हे एक तत्व आहे. ब्रह्म आहे. आत्मा आहे. गणपती हे ज्ञानाचे, विज्ञानाचे रुपक आहे. स्वरूप आहे.
गणपती शेतीचे रक्षण करतो. त्याचे शूपकर्ण म्हणजे धान्य पाखडण्याचे सूप आहे तर त्यांचा एकदंत म्हणजे शेतीसाठी आवश्यक असा नांगराचा फाळ आहे. गणपतीला आवडणाऱ्या दुर्वा ह्या ओषधी आहेत. त्या अतिशय थंड असतात. टॉयफाईड वा उष्णतेच्या विकारांमध्ये दुर्वेचा रस अतिशय लाभदायी ठरतो.
लोकमान्य टिळकांनी घरोघरी पूजल्या जाणाऱ्या या सार्वजनिक गणनायकाची १८९२ साली नगरच्या चौकात प्रतिष्ठापना करून सामाजिक गणेशोत्सवाची सुरवात केली. लोकमान्यांनी सामाजिक, अध्यात्मिक व वैचारिक असा त्रिवेणी संगम साधून लोकजागृती केली. समाजामध्ये एकता व संघटन निर्माण केले. भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात गणेशोत्सवाचे योगदान अतिशय मोलाचे ठरले आहे. म्हणूनच गणपती ही एका अर्थाने सामाजिक देवतासुद्धा आहे.
तरी या पवित्र दिवशी आपण ज्ञानी, संयमी, सदगुणी होण्याचा निश्चय करुया. आपले वैयक्तिक व सामाजिक कर्तव्य निष्ठेने पार पाडण्याचा निर्धार करूया हाच खरा गणेशचतुर्थीचा संदेश आहे.
वरील गणपतीचे चित्र माझा खूप जवळचा मित्र निलेश जाधव याच्या चार वर्षाच्या मुलीने ‘समा’ने काढलेले आहे. जर तुम्ही लोकसत्ता वाचत असाल तर कदाचित तुम्ही निलेश जाधवच्या चित्रांशी परिचित असाल. शेवटी बोलतात ना वळणाचे पाणी वळणावरच जाते तेच खरे…

Followers