Monday, 20 February 2012

भोलेनाथाची महाशिवरात्र


शिवशंकर
P
'महाशिवरात्र' हे कल्याणकारी शिवाचे आराधना पर्व असून हिंदू संस्कृतीत फाल्गून महिन्याच्या कृष्‍ण त्रयोदशीला हे पर्व असते. महाशिवरात्रीला मोठे महत्त्व आहे. पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा याच तिथीला मध्यरात्री भगवान शिवशंकराने रौद्ररूप धारण केले होते. यामुळे या रात्रीला महाशिवरात्र अथवा कालरात्री असेही म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य याच महिन्यात उत्तरायणाचा प्रवास प्रारंभ करतो. या महिन्यात होणारे ऋतुचे परिवर्तनही शुभ मानले जाते. म्हणून या महिन्यात येणारी महाशिवरात्र भोलेनाथाची आवडती तिथी आहे. 

'शिव' म्हणजे कल्याण. म्हणून भेदभाव न करता शिवशंकर भाविकांवर चटकन प्रसन्न होतो. त्यांच्या जीवनातील दु:ख दूर करतो. 

गौरी अर्थात पार्वतीच्या या पतीचे वास्तव्य नेहमी स्मशानात असते. स्मशानातील प्रेताची राख ते सर्वांगाला भस्म म्हणून लावतात. गळ्यामध्ये सर्पहार असतो. विष पिऊन कंठ निळा झाल्याने त्याला 'नीलकंठ' म्हणूनही संबो‍धले जाते.

महाशिवरात्री व्रताला सकाळीच प्रारंभ होत असतो. या दिवशी सुवासिनी शिव मंदिरात जाऊन मातीच्या भांड्यात पाणी, दूध भरून त्यावर बेल, धोतर्‍याचे पुष्प व भात टाकून शिवलिंगावर अर्पण करतात. काही महिला घरातल्या घरात ओल्या मातीची शिवलिंग तयार करून त्याचे पूजन करतात. 

महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे. या द‍िनी भोलेनाथ व पार्वती यांचा विवाह झाला होता. यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात. हे व्रत दीड दिवसाचे असते. त्यामुळे त्याचा दुसर्‍या दिवशी सकाळी समाप्त होतो. दुसर्‍या दिवशी महिला ब्राह्मण भोजन घालत पतीचा आशिर्वाद घेऊन महाशिवरात्रीच्या व्रताचा समारोप करतात.

महाशिवरात्रीचे व्रत कुमारीका देखील करतात. शिवरात्रीचे व्रत केल्याने कुमारीकांच्या विवाहातील अडचणी दूर होतात. त्यांना शिवशंकराच्या कृपेने मनाप्रमाणे वर प्राप्त होतो. 

शिवरात्री वर्षभरात प्रत्येक महिन्यात येत असते. मास महिन्यातील महाशिवरात्री ही महत्त्वाची मानली जाते.

महाशिवरात्री



माघ महिन्यातील अत्यंत महत्वाचा व पवित्र दिवस म्हणजे महाशिवरात्र, ही माघ महिन्यात वद्य चतुर्दशीला येते याबाबत एक कथा प्रचलीत आहे.
विंध्य पर्वताच्या घनदाट अरण्यात एक शिकारी राहत होता तो शिकार करून आपल्या बायको मुलांचे पालन पोषण करीत असे. एके दिवशी हरणांची शिकार करण्यासाठी व्याध एका झाडावर लपून बसला होता. झाडांच्या पानंमुळे काही दिसत नव्हते म्हणून तो एक एक पान तोडून खाली टाकू लागला आणि योगायोग असा की त्या झाडाखाली शिवाचे मंदिर होते व ते झाड बेलाचे होते.रात्री एक हरिणी पाणी पिण्यासाठी तिथे आली व्याधाला तिची चाहूल लागली.
व्याध बाण सोडणार तितक्यात त्या हरिणीचे लक्ष त्या शिकाऱ्याकडे गेले व ती त्याला म्हणाली अरे व्याधा जरा थांब! मला मारू नकोस कारण माझी पाडसे घरी वाट पाहत असतील त्यांची भेट घेऊन येते मग मार. त्या शिकाऱ्याने तिचे म्हणणे कबूल केले. व्याधाला दया आली त्याने तो विचार सोडून दिला. त्या दिवशी व्याधा कडून शिवाला बेलाच्या पानांचा अभिषेक झाला होता, शिकार न मिळाल्यामुळे उपवास घडला होता. यामुळे त्याने दाखविलेल्या दयेमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले व व्याधाला हरिणीला बछड्यासह त्यांनी स्वर्गात स्थान दिले म्हणून हा दिवस महाशिवरात्र म्हणून मानण्यात येऊ लागला.
आजही तो व्याध आणि कळपांच्या म्होरक्या मृग हे नक्षत्राच्या रूपाने आकाशात रात्री चमकताना दिसतात.

महाशिवरात्र

माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी शैव पंथीय उपवासाचे व्रत करतात. भगवान शिवाचीआराधना आणि प्रार्थना करून दुसर्‍या दिवशी व्रताची सांगता केली जाते. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो.
महाशिवरात्रीच्या दिवशी हे घोंगलाचे फूल शिवालावाहण्याची विदर्भात पद्धत आहे.


काटेधोत्र्याचे फळ - महाशिवरात्रीच्या दिवशी हे फळशिवाला वाहतात.

Sunday, 19 February 2012


"निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी"
- समर्थ रामदास
 
भिडस्त भारी | साबडा घरी ||
प्रिय मधुरी | भाषण करी ||
मोठा विचारी | वर्चड करी ||
झटून भारी । कल्याण करी ॥
आपासोयरीं। ठेवी पदरीं ॥
लाडावरी । रागावे भारी ॥
- महात्मा फुले!

ज्यांच्या इतिहासाची पाने उलटतांना अंगावर काटा उभा राहतोज्यांच्या अवघ्या नामघोषाने अंगामध्ये रक्त सळसळतेज्यांच्या विचारांनी देखील एक नव चैतन्य प्राप्त होते असेतमाम मराठी मनाचा मानबिंदू,सह्याद्रीच्या माथ्यावर वर्षानुवर्षे तळपणारा क्रांतिसूर्यराष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब यांनी स्वराज्याला अर्पण केलेले युगपुरुष  म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज.
 

"शिवरायांचे ते आठवावे रूप .. शिवारयांचा अठावावा प्रताप ... भूमंडळी अशा आपल्या या अखंड प्रेरणा स्तंभाला आज परत एकदा स्मरण करण्याचे आवाहन जिजाऊ.कॉम आपणा सर्वांना करत आहे.
कशास हवा तुम्हा सिकंदर ,अन कशास हवा कोलंबस !
अरे छत्रपतीला स्मरा एकदाशिव छत्रपतीला स्मरा एकदा,
अन बघा तुम्हीच कि हो सिकंदरअन तुम्हीच हो कोलंबस !
 
खरच आज गरज आहे त्या स्फूर्तीचीतमाम मावळ मातीमध्ये रुजवलेल्या त्या दिव्य स्वप्नाचीस्वराज्याच्या स्वप्नाचीसामान्य माणसाच्या स्वप्नातील स्वराज्याचीयाच साठी शिवरायांनी जीवनभर एकच वसा घेतला होता तो म्हणजे माणसे घडवण्याचा आणि त्यांना एकत्र जोडण्याचाआपल्या कर्मानेच आपल्या राष्ट्राची निर्मिती आथवा विकृती सुद्धा होत असते हा विचार त्यानी स्वराज्यातील लोकांमधे खोलवर रुजविला .म्हणूनच तानाजीबाजीप्रभूबाजी पासलकरजिवा महाले असे अनेक ज्यांची इतिहासामधे साधी नोंद पण नाहीए असे लोक स्वराज्या निर्मिती च्या कार्या मधे कामी आले.त्या सर्वांच्या मनामधे एकच भावना होती ती म्हणजे-स्वराज्य निर्मिती हे आमचे कार्य आहे आणि आमचे प्राण गेले तरी बेहत्तर पण स्वराज्याची घौड्दौड,शिवबाची घौड्दौड कधी ही थांबली नाही पाहिजेआज आपण पण हीच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला काही बदल हवा असल्यास तो बदल आपणच घडवून आणला पाहिजेलोकसभा किंवा विधानसभे मधे बदल घडवून आपल्या देशाचे भवितव्य बदलणार नाहीत्या साठी गरज आहे आपल्याला बदलण्याची,आपले विचार बदलण्याचीआपल्या विचारणा एक योग्या दिशा देण्याचीदेशाची कमान जो पर्यंत एक दिशा आणि दूरदृष्टी असलेल्या तरुणांकडे आसणार नाही तो पर्यंत या देशाला साक्षात ब्रम्हदेव सुद्धा वाचवू शकनार नाहीकाळ फार कठीण आहे मित्राणोगरज आहे आता आपल्यालाच पेटून उठण्याचीडोळ्यात तेल घालून आपल्या देशाचीभाषेची आणि आपल्या संस्कृतीची सुरक्षा करण्याचीगरज आहे मानसिक गुलामगिरीतून मुक्त होण्याची!

शिव चरित्रा सारखा धगधगता दिपस्तंभ समोर आसताना हे कार्य कठीण नाहीछ्त्रपती शिवाजी महाराजांना आदर्श माननारा कधीच कुठल्याही प्रकारच्या गुलामगिरी मधे असूच शकत नाहीत्याच्या मधे प्रचंड आत्मविश्वास आणि स्वाभिमान असतोअत्यंत प्रतिकूल परिस्थीत मधे सुद्धा निराश न होता संकटातून बाहेर पडण्याची ताकत त्याच्या मधे असतेशिवाजी महाराज आज येणार नाहीतआणि कधी आले तरी ते तुमच्या आमच्या हाता मधे ढाल-तलवार देणार नाहीतआजचे युद्ध आहे ते ज्ञानाचेविचारांचेसंगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचेशिव चरित्रातून प्रेरणा घेऊन आपण आपल्यातला मी पणा सोडूनआजच्या या स्पर्धात्मक युगात कलाक्रीडाविज्ञान संस्कृतीभाषाप्रशासन अशा अनेक क्षेत्रा मधले विविध गड जिंकून आपल्याला एका उज्वल आणि बलवान भारत देशाची निर्मिती करायची आहेत्या साठी लढायचे आहेतेव्हाच आपल्या देशाकडे कोणाची ही वाकडी नजर टाकण्याची हिंमत देखील होणार नाहीजिजाऊ मा साहेबांच्याशिवबाच्या आणि आपल्या स्वप्नातील स्वराज्य याची देही याची डोळा प्रत्यक्षात अवतरलेले आपल्याला दिसेल.
 
चला तर मग जमेल तेथे जमेल त्या मार्गाने समाजातील अनिष्ट चालीरीतीजातीभेदअज्ञान,
शासनातील किंवा इतर ठिकाणचा भ्रष्टाचार आणि एका प्रगत राष्ट्राला जे काही बाधक आहे त्या सगळ्याचा विरोध करू!
 
 
शेवटी स्वाभिमानाच्या सूर्यालापर्वतासारख्या खंबीर राजालाजिजाऊच्या सिंहाला आणि त्याच्या कर्तुत्वाला समस्त महाराष्ट्राचा मानाचा मुजरा!
 
जय जिजाऊजय शिवरायजय महाराष्ट्र!

Followers